Tuesday, April 14, 2026
HomeUncategorizedपुण्यात सिंचन प्रकल्पांना गती; 12 गावांना मिळणार दिलासा

पुण्यात सिंचन प्रकल्पांना गती; 12 गावांना मिळणार दिलासा

पुणे प्रतिनिधी

सिंचन भवन येथे माननीय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार राहुलदादा कुल यांच्या विशेष प्रयत्नातून झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

सदर प्रकल्पासाठी 1.14 टीएमसी पाणी उपलब्ध असून 30 मेपर्यंत मंजुरी अपेक्षित आहे. या योजनेत 12 गावे लाभार्थी ठरणार असून सुमारे ₹1100 कोटी खर्चाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 1000 मिमी पाइपलाईन उभारणी, बॅरेज डिझाईन, कन्सल्टंट नियुक्ती व ठोस टाइमलाइन निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.

मे अखेरपर्यंत लेआउट, जूनपर्यंत अंदाजपत्रक व 30 जूनपर्यंत प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रकल्पात 100% सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे.

याशिवाय चासकमान कालवा, शिक्रापूर शाखेतील रिक्त पदे भरणे व जातेगाव बुद्रुक येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचेही निर्देश देण्यात आले.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पाणीटंचाई कमी होऊन शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती शेखर पाचुंदकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

सर्वात लोकप्रिय