पुणे प्रतिनिधी
शिरूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी यांच्या कडून पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती पै. मंगलदास बांदल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून शिरूर लोकसभेसाठी बांदल
काही दिवसापूर्वी बांदल यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.त्यावेळी बांदल यांच्या डोक्यात तरी काय असा सवाल विचारला जात असताना आज वंचित बहुजन आघाडीने पुणे, शिरूर, संभाजीनगर,नांदेड, परभणी या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करीत पुणे लोकसभेसाठी माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देत बारामतीसाठी सुप्रिया सुळे यांना पाठींबा दर्शवला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत बांदल यांनी शिवनेरीच्या पायाथ्याशी जाहीर सभा घेत निवडणुकीचे रणशिंग फुकले होते, परंतु शरद पवार आणि अजित पवार यांनी राजकीय वाटाघाटी करत त्यांचे बंड थंड करत खासदार अमोल कोल्हे यांना पाठींबा दिला आणि चौथ्यादा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आढळराव पाटलांना पराभवला सामना करावा लागला.
घरातून कुठलीही राजकीय पाठबळ नसताना शिक्रापूर गावाचे सरपंच, आपला जिल्हा परिषद गट सोडून दुसऱ्या गटातून जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीत मातब्बर राजकीय मंडळींना धूळ चारत सभापती ते २००९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून निवडणूक लढवत राजकीय विक्रम शिरूर तालुक्यात त्यांनी केला.
राजकीय पटलावर बांदल काय करतील यांचा नेम नाही
येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने कधी शरद पवार यांची भेट, आधी अजित पवार यांच्या सभेला उपस्थित सांगलीच्या पै. चंद्रहार पाटील यांच्या समर्थनात उद्धव ठाकरे यांच्या समवेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट सर्वांची धांदल उडवत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत शिरूर लोकसभेची उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पडून घेण्यात त्यांना यश आल्याने कोणाची वाजवणार की कोणाची वेळ बदलणार हे येत्या काळात पाहिला मिळेल. त्यांच्या उमेदवारी मुळे कोणाला किती फायदा की कोणाला किती तोटा हे निकालानंतर समजेल. त्यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी आनंद साजरा करत सोशल मीडियातून स्वागत केले आहे.