कोरेगाव भीमा
पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गांवर रात्रीच्या दोनच्या सुमारास नगरच्या दिशेने पुण्याच्या जाणाऱ्या जनसेट वाहक पिकअप गाडी रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. (The pickup truck carrying the genset overturned in the middle of the road)सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
जनसेट वाहक पिकअप क्रमांक एम एच १२ एफ डी ०३५३ नगर कडून पुण्याच्या दिशेने जात असताना कोरेगाव भीमा हद्दीतील कल्याणी फाटा जवळील इंडियन ऑइल पेट्रोलिंयम पंपसमोर अचानक पलटी झाल्याने मोठा आवाज आला त्या आवाजाने पंपतील माजी उपसरपंच हिरामण दरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत मदत कार्यात सहकार्य करत वाहन चालकाला गाडी बाहेर काढत वेगाने येणाऱ्या वाहनाचा अपघात होऊन नहे म्हणून खबरदारी योग्य ती खबरदारी घेतली. रस्त्यावरील वाहनाना मार्गस्थ मोकळा करून दिला.
सदर घटनेची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशन व महामार्ग पोलिसांना देण्यात आली. यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन अतकारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली.