पुणे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ आणि पक्ष अजित पवार गटाला गेल्याने सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी शरद पवार गटाने कपबशी, वटवृक्ष आणि तुतारी या चिन्हाची मागणी केली होती.
शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले आहे. तुतारी ही शौर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात याला अनन्या साधारण महत्व आहे. या चिन्ह सोबत पुन्हा एकदा नव्याने सुरवात करत विरोधकांना अस्मान दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.