सणसवाडी प्रतिनिधी
सणसवाडी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टील उत्पादन करणाऱ्या आर्सलर मित्तल अँड निप्पोन कामगार संघटनेच्या निवडणुक चुरस झाली. या निवडणुकीत विद्यमान प्रतिनिधीना नाकारले. तर नवीन उमेदवाराला संधी देत धक्कादायक निकाल दिला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकूण ३८८पैकी ३७० सभासदांनी मतदारांनी सहभाग घेत त्यात बारा मतदान अवैध झाले. यामध्ये ३५पैकी १०विजयी उमेदवार पुढील प्रमाणे साठे पंडित तात्याभाऊ (२४५), टेमगिरे महेश अर्जुन (२०१),साकोरे उत्तम किसन(१९८),दरेकर तानाजी पंडित (१९०), शिंदे गणेश शिवाजी (१७९),मुंगसे कैलास पोपट(१७९),यनभर नवनाथ तुकाराम(१७५),ठोंबरे अरुण बबन(१७०),ढमाले उदय श्रीपती (१४५), शितोळे मनोहर ज्ञानेश्वर(१४५) हे उमेदवार विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी संदीप पूरकर यांनी जाहीर केले.
निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवाराचे पराभवला सामोरे जावे लागले तर मतदानाचे विभाजन झाल्याने त्यांचा फटका अनेकांना बसला आहे. कही ख़ुशी तर कही गम अशी स्थिती तयार झाली असली तरी पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला आहे.
निवडणूक कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने सर्वांनीच सहभाग घेतल्याने सर्वांचे विशेष आभार यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून संदीप पूरकर यांनी मानले.