सणसवाडी प्रतिनिधी
सणसवाडी येथील आंतरराष्ट्रीय कंपनी आर्सलर मित्तल अँड निप्पोन लि.कामगार व्यवस्थापन समितीची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीसाठी तब्बल ३५ जण आपल नशीब अजमावत असून ही निवडणुकीत जुन्या प्रतिनिधीसह अनेक नवीन कामगारांनी सहभागी झाल्याने चुरशीची होणार असल्याचे पाहिला मिळत आहे.
आर्सलर मित्तल अँड निप्पोन लि.हा कारखाना उच्च प्रतिच्या स्टील उत्पादन करणारा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीचे सामाजिक बंधिलकी जपणारे व्यवस्थापक असून कामगार आणि व्यवस्थापन यांच्या मध्ये धोरनात्मक समन्वय राखत कंपनीला चांगल्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी नेहमीच अग्रभागी असते. या कंपनीतील कामगार संघटना अंतर्गत असली तरी राष्ट्रीय श्रमिक एकता यांना संलग्न आहे. या निवडणूक प्रक्रियामध्ये निवडणूक अधिकारी संदीप पुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.गेले काही महिन्यापासून प्रत्येक उमेदवार आपला प्रचारासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार कामगारांपर्यत पोहचवत आहे.
या संघटनेचे एकूण ३८८ सभासद असून शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे असे निवडणूक अधिकारी संदीप पूरकर यांनी सांगितले आहे.