सणसवाडी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पाचवी ( Scholarship Exam ) विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता.१८ ) फेब्रुवारीला होणार असून, पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परीक्षा केंद्रात (२११२१४)इयत्ता पाचवीसाठी २११ विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहेत.(Scholarship Exam ) याकेंद्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी, वसेवाडी, दरेकरवाडी, जिजामाता इंग्लिश स्कुल, जयवंत पब्लिक स्कुल या शाळांनी सहभाग होता.
इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचे दर वर्षी आयोजन करण्यात येते. यंदा ही परीक्षा १८ फेब्रुवारीला होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील आठ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या माध्यमातून दर वर्षी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. त्यात प्रत्येकी १५० गुणांचे दोन पेपर असतात