Homeस्थानिक वार्तापुणे४० वर्षानंतर शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

४० वर्षानंतर शालेय जीवनातील आठवणींना उजाळा

प्रतिनिधी जिजाबाई थिटे

जुन्नर तालुक्यातील अणे येथील सरदार पटेल विद्यालयातील सन १९८३ते ८४ साली इ १०वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेत जुन्या आठवणी ताज्या करत कार्यक्रमाला लावली उपस्थिती.

यावेळी जीवन आनंद आणि सक्षम करणाऱ्या त्याकाळातील शिकवाणाऱ्या शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांना फेटे आणि ढोल ताशा गजरात वाजत गाजत केलं स्वागत करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिक्षक अवचट ,दांडगव्हाळ ,अनंथा आहेर यांच्यासह शाळेचे शिपाई ज्ञानेश्वर काका हजेरी लावत माजी विद्यार्थ्याशी केली हितगुज.

या कार्यक्रमांची सुरवात सरस्वती पुजन करत स्वागत गीत म्हणून माजी विदयार्थ्यांचे भव्य स्वागत केल्याने माजी विद्यार्थी भारावून गेले. या कार्यक्रमाला शिक्षक अवचट आणि दंडगव्हाळ यांनी मार्गदर्शन करत मारल्या चाळीस वर्षातील जीवनातील गोड गप्पागोष्टी. यावेळी शाळा, जीवन, पालकांत्व, जबाबदारी याबाबत अनुभवाचा जीवनपट माजी विद्यार्थी यांनी आपल्या शिक्षकांसमोर मांडत तब्बल चाळीस वर्षेचा आनंद अश्रूनी कार्यक्रमचा आनंद घेतला कार्यक्रमाच्या सरते शेवटी निरोप घेताना पुन्हा एकदा भेटण्याच्या घेतली शपथ.

या कार्यक्रम करण्यासाठी माजी विदयार्थी सुधीर आंबेकर,धोंडिभाऊ शिंदे,निवृत्ती शिंदे,जयराम दाते,निवृत्ती आहेर,हनुमंत दाते,तुषार आहेर,बाबाजी शिंदे,मारुती आव्हाड,अलका आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.निवृत्ती आहेर यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्रांचे आभार मानले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या