Homeताज्या बातम्यासरपंच नवनाथ काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राजकीय धूळवड

सरपंच नवनाथ काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राजकीय धूळवड

थेऊर ता.६फेब्रुवारी

सरपंच परिषदेचे अध्यक्षव थेऊर गावचे माजी सरपंच नवनाथ काकडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी राजकीय मंडळींनी सरपंच नवनाथ काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील राजकीय जीवनाला शुभेच्छा दिल्या.
     ५ फेब्रुवारी रोजी थेऊर येथील राहत्या घरी झेंडा फेम चे ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या गायनाची संगीत मैफिल रंगली. राजकीय क्षेत्रातील मंडळी, मित्रपरिवार, नातेवाईक, यासह खास करून यशवंत सहकारी साखर कारखान्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे जाहीर करत सर्वांनीच शुभेच्छाचा वर्षाव केला.
     नवनाथ काकडे हे यशवंत कारखान्याच्या कामगारांचा मुलगा ते सरपंच पर्यत राजकीय कर्तृत्वाने पुढे येत समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती, जोडधंदा म्हणून दोन गाई घेत दूध व्यावसायिक तेथून सुरु झालेला प्रवास ते डेव्हलपर्स असा त्यांचा व्यावसायिक, राजकीय, सामाजिक जीवन पट सर्वांनीच उलगडून दाखवला. गोड स्वभावाने जीवनात जोडललेली माणसं आज उपस्थित राहून आशीर्वाद देत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.आई वडिलांची पाठींबा पत्नीची साथ भाऊ भावाजय यांचा सहयोग यामुळे माझ्या राजकीय, सामाजिक जीवनाला मोलाची साथ मिळाली आहे. त्यामुळे मी हे कर्तृत्वान समर्थ उभं करू शकलो आहे.

काकड्याच्या पोराला संधी द्या


वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी आपल्या खास शैलीत शुभेच्छा देत असताना राजकीय धूळवड उडवली.आता पर्यतच्या आयुष्यत नवनाथ काकडे यांनी कधीच येवढा मोठा वाढदिवस साजरा केला नाही. आज मात्र वाढदिवस घालण्याचा कारण वेगळ आहे. यशवंत कारखाना निवडणुकीच बिगुल वाजलंय म्हणून काकड्याच्या पोराला या निवडणुकीत संधी द्या असा पाहुणा म्हणून माझी विनंती आहे.


मेहुण्याच्या राहणीमानाबद्दल केली दाजी केली मिस्किल टिप्पणी


पीडीसीसी बँकेचे संचालक सुरेश घुले यांनी नवनाथ काकडे यांच्या राहणीमान अतिशय उत्तम त्यात त्यांच्या कपड्याची निवड कुछ और असं म्हणतं आपल्या मेहुणे नवनाथ यांची दाजी मेहुणे यांच्या नात्यातील गोडवा दिसून आला.  जीवन सुखकर करण्यासाठी नवनाथ काकडे यांनी जे कष्ट केले ते खरंच प्रेरणादायी असून त्यांच्या राजकीय जीवनाला शुभेच्छा देत राजकीय भाष्य टाळलं.
    यावेळी यशवंत कारखान्याचे माजी चेरअमन के डी कांचन,संचालक सुरेश घुले,बाजार समितीचे रोहिदास उंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, दूध संघांचे गोपाळ म्हस्के, डी एल कुंजीर,बाजार समितीचे संचालक मिलिंद गायकवाड,भाजपा नेत्या पूनम चौधरी यासह राजकीय मंडळी, यशवंत कारखान्याचे सभासद यांनी उपस्थिती लावली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या