Homeस्थानिक वार्तावेळ प्रत्येकाला आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी देते..!

वेळ प्रत्येकाला आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी देते..!

- युवा साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर पाटील यांचे प्रतिपादनता.

( पुणे प्रतिनिधी)

परीक्षा म्हटले की प्रत्येकाच्या काळजात धडधड होतं. परंतु त्याचा बाऊ न करता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेले तर यश हमखास मिळते. आपल्याला आपली योग्यता सिद्ध करायची असेल तर परीक्षेशिवाय पर्याय नाही. वेळ प्रत्येकाला आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी देते, तो क्षण हाच आहे अशा शब्दात पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर पाटील यांनी वाघोली येथे भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्वप्रथम साहित्यिक शिक्षक बेंडभर यांचे स्वागत पांडुरंग पवार यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. तर प्रांजली ठुबे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय करून दिला.याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य संतोष भंडारी, पांडुरंग पवार, वंदना बोडके, आदिती कदम, प्रांजली ठुबे, मंगल शेळके, शैला निंबाळकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

विदयार्थ्यांना प्रमाण पत्र देताना कवी सचिन बेंडभर

वाघोली येथील भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर पाटील यांना परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन करताना परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी? पेपर सोडवताना कोणत्या चुका टाळाव्यात, यश मिळवण्यासाठी नेमके काय करावे याबद्दल अचूक मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले.ते पुढे म्हणाले,एकटा माणूस स्पर्धेसाठी धावला तर कालांतराने त्याचा वेग कमी होतो परंतु सोबतीला अनेक जण असतील तर आपल्या कामाचा वेग व आवाका वाढतो. आपण किती पाण्यात आहोत याचा आपल्यालाच अंदाज येतो. आपल्यातील प्लस-मायनस गोष्टी आपल्या लक्षात येतात. तसेच आपण स्वतः आत्मपरीक्षण करून झालेल्या चुका टाळू शकतो. सराव सातत्य आणि चिकाटी हे यशापर्यंत पोहोचण्याचे मार्ग आहेत. तब्बल दोन तास चाललेल्या या व्याख्यानात मुले हरकून गेली. यावेळी त्यांनी ज्ञानवंत आणि मंथन या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिकेतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आलेल्या येते जगाया उभारी व आजोळ या कविता त्यांना गाऊन दाखवल्या.

कार्यक्रमाचे संयोजन वंदना बोडके, सुत्रसंचालन आदिती कदम, स्वागत पांडुरंग पवार यांनी केले. तर आभार मंगल शेळके यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या