Homeअर्थकारणविद्यार्थ्यांनो तुम्ही गुणवंत आहात किर्तीवंत व्हा -चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांनो तुम्ही गुणवंत आहात किर्तीवंत व्हा -चंद्रकांत पाटील

जिजाबाई थिटे

सेकंडरी स्कूल एम्प्लाईस क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या सभासद पाल्य -गुणगौरव समारंभ कार्यक्रमाच्या निम्मिताने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनेट्रॅव्हलिंग बॅग व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले संस्थेचा हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे दरवर्षी सभासदांच्या एस.एस.सी. उत्तीर्ण पाल्यांचा गुणगौरव करण्यात येतो.

या वर्षी हा कार्यक्रम गोदावरी हायस्कूल आकुर्डी या ठिकाणी संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असताना पाटील म्हणाले की विद्यार्थी गुणवंत आहेत त्यांनी उच्च ध्येय प्राप्त करून कीर्तीवंत व्हावे आणि आपल्या पालकांचा नावलौकिक करावा अशी अपेक्षा व्यक्त करुन संस्थेच्या अनेक योजना सुरु असून भविष्यात संस्थेचे मोबाईल ॲप सुरु करण्यात येणार आहे जेणेकरून सभासदांना आपले व्यवहार त्या ॲपवर पाहता येतील.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून गोदावरी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुनिता बॅनर्जी तसेच अव्दैतय पांडे .पिंपरी चिंचवड शहर मुख्याध्यापक संघाचे खजिनदार बाबाजी शिंदे उपस्थित होते .

सर्व मान्यवरांचे स्वागत शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व संचालक तुकाराम बेनके यांनी केले प्रस्ताविक सातारा जिल्हा संचालक प्रतिनिधी पांडुरंग कणसे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध योजनांची माहिती सांगून संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे.सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिन नलवडे व संस्थेचे संचालक यांनी संस्थेची नवीन योजना देशांतर्गत पर्यटन यामध्ये.काश्मीर टूर साठी सभासदांना नोंदणी करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक तुकाराम बेनके यांनी तर आभार संचालक भाऊसाहेब आहेर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या