Homeक्राइमवाहतूक पोलीसांनी चुकलेल्या चिमकल्याला दाखवली घरांची वाट

वाहतूक पोलीसांनी चुकलेल्या चिमकल्याला दाखवली घरांची वाट

वाघोली प्रतिनिधी

पुणे नगर महामार्गांवरील केसनंद फाटा याठिकाणी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात नियुक्त केलेल्या पोलीस शिपाई स्वप्निल गालफाडे आणि सागर चौधरी यांना वाहतूक नियमन करत असताना एक पाच वर्षीय चिमुकली भर चौकात पायी रडत जात असताना आढळून आल्याने त्यांनी तिला त्वरित ताब्यात घेत त्यांच्या सहकारी स्नेहल टकले यांच्या जवळ स्वाधीन करत तिला शांत करण्यासाठी दिले. त्यानंतर तिची काळजीपूर्वक विचारपूस केल्यावर तीने तिचे नाव मनस्वी शैलेश उमाळे असे सांगितले.

सदर परिसरात तिचे वडील आढळून आले नसल्याने वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांनी आजूबाजूला पायी फिरून त्यांचा शोध घेऊन योग्य ती खातरजमा करूनच त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमध्ये पोलिसांची जनमाणसाबद्दल असणारी आपुलकी, प्रेम दिसून आल्याचं पाहिला मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या