Homeताज्या बातम्यावाबळेवाडीच्या विद्यार्थ्यांची गणित प्राविण्य परीक्षेत बाजी

वाबळेवाडीच्या विद्यार्थ्यांची गणित प्राविण्य परीक्षेत बाजी

( शिक्रापूर प्रतिनिधी)

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आणि पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ आयोजित गणित प्राविण्य परीक्षेत पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या शाळेने बाजी मारत उत्तुंग यश मिळवले आहे. इयत्ता आठवीच्या या विद्यार्थ्यांना जयश्री पलांडे व सुनील पलांडे यांनी मार्गदर्शन केले होते. या उत्तुंग यशाबद्दल शाळेकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.

गणित अध्यापक मंडळाद्वारे घेतल्या गेलेल्या प्राविण्य परीक्षेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण खालील प्रमाणे :श्रावणी नवनाथ इंगवले-72, वेदांत नितीन बोऱ्हाडे-72, अपेक्षा जालिंदर वाबळे-69, सिद्धी शामकांत माळी-69, आदिती बापू मोरे-66,आदित्य अतुल शिंदे-64, अश्मिका शितल पाटील-63, रुत्विज विशाल सावंत-61, सृष्टी रवींद्र नेमाणे-58, पौर्णिमा दत्तात्रय मासळकर-53, ईश्वरी संजय मासळकर-53, मधुरा उत्तम काळे -52, साईराज ज्ञानेश्वर मासळकर -50, विवेक गणेश कदम -45, दिशांत संदीप काळे-43, वेदांत जीवन तांबे-43,श्रीनिवास अनमोल करंजे-41, तनिष्का कैलास शेळके -40, शर्वरी ज्ञानदेव पाचर्णे-40, यज्ञ शरद काळे-38, गौरी गणेश टेमगिरे -38, आदिती संजय तांबे- 37, तन्मय लक्ष्मण शिवले-37वरील सर्व विद्यार्थी यापुढील प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.

तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य आणि वाबळेवाडी ग्रामस्थ आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत विजय गोडसे तर आभार किरण अरगडे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या