Homeसंपादकीयभुरा- शिकणाची ऊर्जा देणारे पुस्तक.....डॉ . शीतल खिसमतराव

भुरा- शिकणाची ऊर्जा देणारे पुस्तक…..डॉ . शीतल खिसमतराव

पुस्तकमैत्री बुक गॅलरी राजगुरूनगर ता. खेड या ठिकाणी पुस्तकावर चर्चा,या उपक्रमांतर्गत प्रा.शरद बाविस्कर लिखित “भुरा “या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे पाचवे पुष्प गुंफण्यासाठी डॉ. शीतल खिसमतराव या उपस्थित होत्या. प्रा. शरद बाविस्कर लिखित भुरा या पुस्तकावर त्या बोलत होत्या.शरद बाविस्कर यांचे भुरा हे आत्मकथन संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ऊर्जा पेरणारे पुस्तक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या आयुष्यातून, संघर्षातून प्रेरणा घेऊन आजच्या तरुण पिढीने सक्षम होणे गरजेचे आहे. ग्रामीण खेड्यातील दहावी नापास झालेला तरुण,आपल्या पाचवी शिकलेल्या आईचे तत्वज्ञान आदर्श मानून,कोणत्याही अडथळ्याला न जुमानता,परदेशात जाऊन पाच विषयात मास्टर पदवी मिळवतो. वेगवेगळ्या आठ भाषांवर प्रभुत्व मिळवतो.शेवटी जे. एन. यु. सारख्या विद्यापीठात प्रोफेसर होतो. त्यातून एक गोष्ट लक्षात येते की केवळ शिक्षणच माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकते. या कहाणीचा हिरो शरद बाविस्कर नसून शिक्षण आहे असे त्या म्हणाल्या डॉ.शितल खिसमतराव यांनी प्रभावीपणे बाविस्करांचा संघर्षात्मक जीवनप्रवास उलगडून दाखवला. पुस्तकमैत्री बुक गॅलरीच्या संचालिका सौ. मयुरी भवारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. राहुल जोशी,प्रतीक खिसमतराव,कुंतल जाधव,मनोहर मोहरे,संदीप पाटील, प्रा संतोष लांडे,संगीता लोहकरे,प्रणव टीमुणे,दिनेश नेमन,सुयोग सोडये, केदार बच्चे,स्वाती शिंदे,मीना मुळूक, सुभाष देशमुख,प्रणव टाकळकर, चेतना टाकळकर,बंडोपंत कर्वे,अरुण जोशी,गीतांजली पाटील तसेच डॉ. हनुमंत भवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नीलम गायकवाड यांनी केले तर संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या