Homeताज्या बातम्याबहीण भावाच्या नात्यात गोडवा कायम

बहीण भावाच्या नात्यात गोडवा कायम

सणसवाडी (ता.६फेब्रुवारी) शिरूर तालुक्यातील धानोरे येथील कै.नानाभाऊ भिमाजी फदाले रामदास,भिमाजी नंदन भिमाजी फदाले,सुदाम भिमाजी फदाले,नामदेव भिमाजी फदाले यांच्या कुटूंबातील वडिलोपार्जित सात एकर जमीन असताना बहिणींनी भावाच्या पाठीशी खंबीर उभे राहात विना मोबदला हक्क सोडपत्र करत एक आदर्श घालून दिला आहे.

महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग जरी झाला असला तरी नात्यातील समृद्धी मात्र कमी होत चालली आहे. वाड वडिलांची जमिनीवर आता शासनाने सुद्धा हक्क सांगितलं असताना सुद्धा भाऊ बहीण जमिनीच्या तुकड्यासाठी वाद करत रक्ताच्या नात्यात दुरावा आणत असल्याचे प्रकार आपण पाहात जरी असलो तरी धानोरे (शिरूर ता.)या गावातील कै भिमाजी म्हातारबा फदाले कुटूंबातील मुली सोनाबाई चिंधु सावंत,नानाबाई रामचंद्र नेहरे यांनी मात्र आपल्या भावा बहिणीच्या नात्यात गोडवा कायम राहा म्हणून वडिलांच्या पश्चात भावाच्या जमिनीतील नावावरील हक्कसोडपत्र करत जमिनीतील मोहाचा त्याग करत भाऊबीज आणि रक्षाबंधन या दिवसाच्या साडी चोळीची अपेक्षा ठेवली आहे.

एकीकडे जमिनीचे भाव गगनाला भिडले असताना कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने आपला हक्क जरी सोडला असला तरी अधिकार मात्र अबाधित ठेवला आहे. या घटनेने सर्वांचे चेहऱ्यावर आनंद पाहिला मिळाला आहे. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव पाहिला मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या