Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी रामदास दरेकर

पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी रामदास दरेकर

सणसवाडी प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या सणसवाडी ता. शिरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गटाचे) पुणे जिल्हा कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली आहे. सणसवाडीकर यांच्यावर राष्ट्रवादीने टाकलेल्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादीची सणसवाडीवर भिस्त असल्याचे दिसून आले. नुकतीच सणसवाडीतील भूमिपुत्रांची जिल्हा निवडीबद्दल सणसवाडी गावासह शिरूर तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून व शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्यकारणीमघ्ये जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास दरेकर यांची एक मताने निवड करण्यात आली.

त्यांना या निवडीचे पत्र खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी जिल्हा व तालुका पदाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, बालाजी गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते सणसवाडी या गावातील रामदास दरेकर यांच्या निवडीबद्दल त्यांचा गावोगावी सत्कार होत असून त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या