Wednesday, February 4, 2026
HomeUncategorizedपुणे जिल्हा परिषद निवडणूक: शिक्रापूर-सणसवाडी गटात नाट्यमय घडामोडी; बंडखोरी थोपवण्यात नेत्यांना यश,...

पुणे जिल्हा परिषद निवडणूक: शिक्रापूर-सणसवाडी गटात नाट्यमय घडामोडी; बंडखोरी थोपवण्यात नेत्यांना यश, पण चुरस कायम!

शिरूर (पुणे): पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिरूर तालुक्यात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळाले. सकाळपासूनच सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी बंडखोरांची आणि अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी फिल्डिंग लावली होती. यामध्ये काही ठिकाणी नेत्यांना यश आले असले, तरी अनेक जागांवर अटीतटीची लढत निश्चित झाली आहे.

शिक्रापूर-सणसवाडी गट: ‘ती’ माघार आणि चर्चेला उधाण

शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात मोठी चुरस पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कुसुम बाळासाहेब खैरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम धैर्यशील मांढरे आणि अपक्ष उमेदवार मंगल सासवडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.​हे सर्व दिग्गज उमेदवार मागे हटल्याने ही निवडणूक आता एकतर्फी किंवा सहज होईल, अशी चिन्हे दिसत होती. मात्र, शिक्रापूरचे उपसरपंच त्रिनयन कळमकर यांच्या पत्नी सीमा त्रिनयन कळमकर यांचा एकमेव (अपक्ष/तगडा) अर्ज रिंगणात राहिल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. आता या गटात राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सणसवाडी गण: राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष लढत
​सणसवाडी गणातही उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे.
रिंगणात असलेले उमेदवार: मनिषा संपत गव्हाणे (राष्ट्रवादी काँग्रेस), कोमल सत्यनारायण ढेरंगे (अपक्ष) आणि मीना ढेरंगे (अपक्ष).
​यांनी घेतली माघार: अश्विनी युवराज दरेकर आणि सुनंदा नवनाथ दरेकर या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेत पक्षाच्या किंवा अन्य उमेदवारांना वाट मोकळी करून दिली आहे.
शिक्रापूर गण: ‘रामभाऊ विरुद्ध पंढरीनाथ’ थेट सामना
​शिक्रापूर गणात मात्र राजकीय संघर्ष थेट पाहायला मिळणार आहे. महायुतीमधील प्रमुख पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार आमनेसामने उभे केले आहेत.

या दोन दिग्गज नेत्यांमधील लढत प्रतिष्ठेची बनली असून, शिक्रापूर कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

सर्वात लोकप्रिय