Homeस्थानिक वार्तापुणेआद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रेरणास्त्रोत.....डॉ प्रशांत नारनवरे

आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रेरणास्त्रोत…..डॉ प्रशांत नारनवरे

प्रतिनिधी जिजाबाई थिटे

आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे मत महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्हा यांचे विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आदर्श प्रेरणा पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कस्तुरी गार्डन उरुळी कांचन पुणे येथे केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशदा व बार्टीचे मा.संचालक रवींद्र चव्हाण होते कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समिती पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष भीमराव धिवार,सचिव रा. वी. शिशुपाल,उपाध्यक्ष एम. जी. शेलार,सहसचिव विजय रोकडे,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोकराव नाळे,मा सिनेट सदस्य डॉ.दत्तात्रय बाळसराफ,पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्याक्षा स्नेहल बाळसराफ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.नारनवरे पुढे म्हणाले की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांना प्रचंड संधी उपलब्ध असून महिलांनी ताकतीने पुढे येण्याची गरज आहे. आज ज्या महिला शिक्षकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशा शिक्षकांनी आपल्या शाळेत वंचितांपर्यंत शिक्षणाची ही ज्ञानगंगा पोचवण्याचं काम प्रभावीपणे करावं.महिला व बालकल्याण विभागामार्फत अनेक योजना शासन स्तरावर राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ देखील समाजातील विविध वर्गातील महिलांनी घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. समितीचे अध्यक्ष भीमराव धिवार यांनी समिती समाजातील विविध घटकांसाठी करीत असलेल्या कामाचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव विजय रोकडे यांनी तर आभार सचिव रा.वी.शिशुपाल यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या