लोणीकंद प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील खेड आणि हवेली तालुक्यांना जोडणाऱ्या मरकळ पुलावर अवजड वाहनांना बंदी असताना सुद्धा शासनाच्या नियमाची पायमल्ली करत अवजड वाहने या रस्त्याने वाहतूक करत असल्याने वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळाली आहे.यामुळे लहान वाहनात प्रवास करनाऱ्या प्रवासाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मात्र प्रशासन का कानाडोळा करत आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनाच्या लांबच लांब रांग तयार झाल्या होत्या. यामध्ये अवजड वाहनांना कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना मनमानीपणे बिंदास अवजड वाहने प्रवास करत आहे. पूल हा कमकवत असल्यामुळे नदीवर बॅरिगेशन बसवले असताना सुद्धा काही मालवाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट धारकांनी ते उकडून बाजूला फेकून दिले आहे. या रस्त्याला मरकळ, भोसरी, फुलगाव यासारख्या मोठ्या औद्योगिक वसाहतीना जवळचा जोडणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते.मुळातच हा रस्ता अरुंद असल्यामुळे दुहेरी वाहतूक होणे सुद्धा कठीण असताना सुद्धा अवजड वाहने मात्र बिंदास मनमानीपणे वाहन चालवत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. त्यातच मरकळ हद्दीतील पूल हा कमकवत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शकता आहे. या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम धीम्यागतीने चालू आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील स्थानिक म्हणतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!