Homeअर्थकारणअरुणा लाळगे यांना कॉसमॉस आदिशक्ती पुरस्कार

अरुणा लाळगे यांना कॉसमॉस आदिशक्ती पुरस्कार

पुणे

८ मार्च महिलादिनानिमित्त परिश्रमातून प्रगतीकडे सन्मान स्त्री कर्तृत्वाचा वारसा तीन पिढीचा हे ब्रीद वाक्य घेऊ यंदाचा कॉसमॉस आदिशक्ती पुरस्कार हा कॉलिटी इंटरप्राईजेस या ऑटो क्षेत्रातील कंपनीच्या सर्वेसर्वा अरुणा बाळासाहेब लाळागे यांना देण्यात आला.

अनादी अनंत काळापासून स्त्री ही विविध रूपात सर्वत्र वावरत आहे. स्त्री ही मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई, सासू, असे नात्यांचे असंख्य पदर हळुवार सांभाळत आहे. कौटुंबिक जबाबदारी बरोबर स्त्री ही शिक्षण, तंत्रज्ञान, संरक्षण, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासकीय, क्रीडा, व्यावसायिक अशासारख्या असंख्य क्षेत्रातही तेवढयाच आत्मविश्वासाने पुढे जात आहे. ती सर्वांना बरोबर घेऊन प्रगती करत आहे. आपल्या संस्कृती आणि संस्कारांचा वारसाही जपत आहे.आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान करावा म्हणून कॉसमॉस बँकेतर्फे दिला जाणारा कॉसमॉस आदिशक्ती पुरस्कार आपणास प्रदान देऊन त्यांचा सन्मान करण्यात बँकेला आनंद होत असल्याचे व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

ग्रामीण भागातील मुलामुलींच्या विवाहासाठी सिद्धी लॉन्स अल्प दरात उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम लाळगे कुटुंबीयांनी केला आहे.ग्रामीण भागातील मुला मुलींना उच्च शिक्षण घेत आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आपण भरारी घेऊ शकतो या पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर अरुणा लाळगे यांनी सांगितले.कुटुंबाबरोबरच इतर कुटुंबीयांची जबाबदारी आपल्या खांद्यावर अनेकांना रोजगार देत आज त्या यशस्वी उद्योजिका म्हणून प्रचलित आहे.समाज समाजव्यवस्था पुरुषांप्रमाणे स्त्री सुद्धा आपल्या कर्तुत्वाचा ठसा आपल्या कामगिरीतून दाखवू शकते याचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच अरुणा लाळगे ग्रामीण भागातील बालपण आणि शहरी जीवन यात अडीअडचणी येत असताना माझे पती उद्योजक बाळासाहेब लाळगे यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे.

यावेळी त्यांना कॉसमॉस बँकेचे आदिशक्ती प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापक संगिता दहिफळे,देशमुख यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या