Homeस्थानिक वार्तापुणेसावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य समाजाला प्रेरणा देणारे -प्राचार्य तुकाराम बेनके

सावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य समाजाला प्रेरणा देणारे -प्राचार्य तुकाराम बेनके

प्रतिनिधी जिजाबाई थिटे


श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा ता.शिरुर येथे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने प्रतीमेचे पूजन सहशिक्षिका ज्योती गजरे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक संतोष शेळके यांनी
सावित्रीबाई फुले यांचा जीवनक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम बेनके यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य समाजाला क्रांतिकारी प्रेरणा देणारे ठरले असून चूल आणि मूल एवढी चकोरीबद्ध पद्धत मोडून पुरुषांच्या बरोबरीने आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात उभी राहिली आहे याची सर्व श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते.या कार्यक्रमाप्रसंगी संचालक पांडुरंग वेताळ, उपप्राचार्य संभाजी कुटे , दिलीप वाळके, संतोष हिंगे, अंबादास गावडे, देविदास कंठाळे, मच्छिंद्र बेनके ,बाबुराव मगर, लक्ष्मण हरिहर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हिंगे यांनी तर आभार नितीन गरुड यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या