प्रतिनिधी: मारुती पळसकर

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात गुरुनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा समारंभ दि.७ रोजी संपन्न झाला.या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेले माजी आमदार पोपटराव गावडेंनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,कुठल्याही सहकारी संस्थेला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्याचे श्रेय हे त्या संस्था चालवणाऱ्या व्यक्तींवर त्यांच्या कर्तबगारीवर अवलंबून असते.

संस्थेचे चेअरमन नवनाथ राऊत यांनी लेखाजोखा मांडताना सांगितले की,गुरुनाथ पतसंस्थेकडे १२ कोटी रुपयांच्या ठेवी असून,८ कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे.तसेच सर्व शाखा ऑनलाईन असून आर टी जी एस सारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सुभाष पोकळे,दिनेश बाबर,सुदामभाऊ इचके,साईकृपा पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव जगताप,सरपंच अरुणाताई घोडे,सरपंच सोमनाथ भाकरे, बाबाजी निचित,संपतराव पानमंद,बाळासाहेब डांगे, बबनराव पोकळे,दीपक रत्नपारखी,बिपिन थिटे,विक्रम निचित,आर बी गावडे,विलास घोडे,पांडुरंग मुंजाळ,अशोक गाडेबैल,जानकु मुंजाळ,विवेकानंद फंड,पांडूरंग भोर,सचिन बोऱ्हाडे,राजेंद्र दरेकर,पत्रकार सुभाष शेटे,संजय बारहाते,अरुण कुमार मोटे,शरीफ मोमीन,योगेश भाकरे,रवी भाकरे,बाबाजी रासकर,पतसंस्थेचे व्हा.चेअरमन पांडुरंग निचित आदि मान्यवर सर्व संचालक मंडळ आणि सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एम निचित यांनी केले तर खंडू निचित यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!