Homeअर्थकारणसविंदणे येथील सोसायटीच्या चेअरमनपदी अरूणकुमार मोटे तर व्हाईस चेअरमनपदी हरीभाऊ पवार यांची...

सविंदणे येथील सोसायटीच्या चेअरमनपदी अरूणकुमार मोटे तर व्हाईस चेअरमनपदी हरीभाऊ पवार यांची निवड

प्रतिनिधी : मारुती पळसकर

सविंदणे (ता. शिरूर ) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरूणकुमार ज्ञानेश्वर मोटे व व्हाईस चेअरमन पदी हरीभाऊ नाना पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सोसायटीचे चेअरमन संभाजी पडवळ व व्हा.चेअरमन जनाबाई किसन पडवळ यांनी राजीनामा दिल्याने भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन,व्हा.चेअरमनपदाची निवड दि.२ रोजी सहाय्यक निंबधक अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लिपिक सरकारी संस्था धायगुडे ए.एस. सचिव रघुनाथ गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

" गाव गाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे आर्थिक स्रोत म्हणून सोसायटी काम करत असते. त्याला शेतीसाठी, शेतीजोड धंद्यासाठी पाठबळ उभं करण्यासाठी या पदाचा वापर कर त्यांच्या शेतीमाल साठवण्यासाठी शासकीय योजना राबवत मालाला योग्य हमी भाव मिळवण्यासाठी जे काही करणे शक्य आहे त्यासाठी कटीबद्ध राहू"
                 अरुणकुमार मोटे (नवनिर्वाचित चेरअमन)

या बिनविरोध निवडी प्रसंगी मा.सरपंच वसंत पडवळ,रा. कॉ. युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर, संचालक रामदास पडवळ, संभाजी पडवळ,कैलास किठे, हरीभाऊ पवार,निलेश मिंडे, माणिक नरवडे, , भाऊसाहेब पडवळ,बाळासाहेब पडवळ, बाळासो लंघे,नवनाथ लंघे,शोभा लंघे ,सरपंच शुभांगी पडवळ, ऊपसरंपच नंदा पुंडे, मा.उपसरंपच भाऊसाहेब लंघे, भोलेनाथ पडवळ,ईश्वर पडवळ,फुलाजी लंघे, जितेश पवार, बाळू पवार,बाळासाहेब पडवळ,दगडू पडवळ,दत्तात्रय नरवडे, पोपट शिंदे,जयदिप लंघे, मयूर कोळेकर, गणेश कोळेकर,विकास गाजरे,वैभव शेलार,धोंडीभाऊ गावडे , जयकुमार मोटे, प्रकाश मेचे, महादू पोखरकर ,फाकटे गावचे सरपंच शंकर पिंगळे, मनिष बोऱ्हाडे, बाबाजी बोऱ्हाडे,भिमाजी कांदळकर,पत्रकार बांधव व पंचक्रोशितील ग्रामस्थ, राजकिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदीप दादा वळसे,डॉ.सुभाष पोकळे,दामुआण्णा घोडे तसेच समस्त ग्रामस्थ सविंदणे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या