Homeताज्या बातम्यासणसवाडी गावाच्या सरपंचपदी रुपाली दरेकर आणि उपसरपंचपदी राजेंद्र दरेकर बिनविरोध निवड

सणसवाडी गावाच्या सरपंचपदी रुपाली दरेकर आणि उपसरपंचपदी राजेंद्र दरेकर बिनविरोध निवड

सणसवाडी प्रतिनिधी

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या सणसवाडी गावाच्या सरपंचपदी रुपाली दगडू दरेकर यांची तर उपसरपंचपदी राजेंद्र सुदाम दरेकर यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक अधिकारी विकास फुके यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

सणसवाडी गावाच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर आणि उपसरपंच दत्तात्रय नामदेव हरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा निर्धारित वेळेत देत दुसऱ्यांना संधी मिळावी म्हणून दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच रुपाली दरेकर आणि उपसरपंच राजेंद्र दरेकर यांची निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर जेसीबीतून गुलालाची उधळण करत डीजे, ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता सभा ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात संपन्न झाली.

यावेळी मावळत्या सरपंच सुवर्णा दरेकर, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य ॲड विजयराज दरेकर, सागर दरेकर, डॉ. मोहन हरगुडे, राहुल हरगुडे, मोहन तुकाराम हरगुडे, सदस्या सुनंदा दरेकर, संगिता हरगुडे, स्नेहल भुजबळ, शशिकला सातपुते, ललिता दरेकर, तनुजा दरेकर, निकिता हरगुडे उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, मार्केट कमिटी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर,माजी उपसरपंच संभाजी साठे, माजी चेरअमन गोरक्ष दरेकर, भाजप बाबासाहेब दरेकर, माजी उपसरपंच नवनाथ भुजबळ,गोरख भुजबळ यासह असंख्य युवक, महिला ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या