Homeइतरसणसवाडी केंद्रात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

सणसवाडी केंद्रात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

सणसवाडी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पाचवी  ( Scholarship Exam )  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता.१८ ) फेब्रुवारीला होणार असून, पुणे जिल्ह्यातील सणसवाडी परीक्षा केंद्रात (२११२१४)इयत्ता पाचवीसाठी २११ विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा देणार आहेत.(Scholarship Exam ) याकेंद्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी, वसेवाडी, दरेकरवाडी, जिजामाता इंग्लिश स्कुल, जयवंत पब्लिक स्कुल या शाळांनी सहभाग होता.
     इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षेचे दर वर्षी आयोजन करण्यात येते. यंदा ही परीक्षा १८ फेब्रुवारीला होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील आठ लाख ९१ हजार ७०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत.महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या माध्यमातून दर वर्षी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. त्यात प्रत्येकी १५० गुणांचे दोन पेपर असतात

दोन वर्षे मिळते दरमहा शिष्यवृत्ती
    परीक्षेच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्याला दरमहा पाचशे रुपये, तर आठवीच्या विद्यार्थ्यास दरमहा साडेसातशे रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र २३ जुलै २०२३ मध्ये शालेय शिक्षण विभागाने ही रक्कम वाढविली आहे. वर्षातील दहा महिने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते.
        यावेळी सणसवाडी केंद्रात २११पैकी २०२विद्यार्थी उपस्थित होते.याकेंद्रात केंद्र संचालक म्हणून संजय गायकवाड,परीवेक्षक आर रोकडे तर केंद्र सहाय्यक म्हणून मुख्याध्यापक सुरेश भंडारे यांनी पाहिले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या