Homeअर्थकारणसंतुलनच्या वतीने कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

संतुलनच्या वतीने कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

विविध क्षेत्रातील महिलांचा केला सन्मान

वाघोली/प्रतिनिधी

वाघोली ता.हवेली येथील सोयरीक गार्डन मंगल कार्यालयात दगडखान क्षेत्रातील वंचितांच्या न्याय व हक्कासाठी रचनात्मक संघर्ष करणाऱ्या संतुलन पाषाण संस्थेच्या वतीने शनिवार (दि.९)रोजी महिला परिषद संपन्न झाली. तुळसी पूजन व सावित्रीबाई फुले,राजमाता मदत तेरेसा यांच्या स्मृतीस वंदन करत महिला व वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

यावेळी डॉ.स्मिता खारकर यांनी वैयक्तिक आरोग्यइतके सामाजिक आरोग्यालाही महत्व असून ते जपण्याचे काम संतुलन संस्था करत असल्याचे मत व्यक्त केले तर राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्राचे महत्त्व विशद करून संतुलनची सर्वसामान्य घटकांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे मत मांडले. तसेच मा.जि.प सदस्या सुजाता पवार यांनी आपण संतुलन महिला चळवळीने भारावून गेलो असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ महिलांचा साडी व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.तसेच विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना विशेष सन्मानित करण्यात आले. विजय साळवे यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात विविध गीते सादर झाली. महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या खास शैलीत ॲड. बी. एम. रेगे यांनी केले.संतुलन संस्थेच्या स्थापनेपासून महिलांसाठी केलेल्या विविध कार्याचा आढावा संतुलन संस्थेच्या संचालिका अॅड. पल्लवी रेगे यांनी दिला.


याप्रसंगी नेत्राली येवले (सामाजिक न्याय विभाग वरिष्ठ निरीक्षक), मा.जि.प.सदस्या सुजाता पवार, डॉ.स्मिता खारकर, ॲड.पल्लवी रेगे,ॲड.बस्तू रेगे,मृदुला सहस्त्रबुद्धे, गुंफा इंगळे,अनिता पवार,जयश्री सातव,सुनंदा दाभाडे,मीना सातव,प्रीती पाठक, दादासाहेब पोकळे,सुरेखा गायकवाड,वंदना भुजबळ, आदिनाथ चांदणे यांच्यासह संतुलन पाषाण संस्थेचे कर्मचारी, शिक्षक वृंद, विद्यार्थी व बचत गटातील महिला आणि दगडखान क्षेत्रातील कष्टकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या