Homeताज्या बातम्याशिरूर , बारामती, मावळ लोकसभेसाठी काँग्रेसकडून तीन नावे जाहीर

शिरूर , बारामती, मावळ लोकसभेसाठी काँग्रेसकडून तीन नावे जाहीर

खेड

लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाकडून महेश ढमढेरे, बारामती लोकसभा मतदारसंघ संग्राम मोहोळ,मावळ लोकसभेसाठी कैलास कदम यांच्या नावावर कॉग्रेस पक्षाच्यावतीने नावे इंडिया आघाडीकडे दिल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी चाकण या ठिकाणी झालेल्या लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार रामहरी रूपनावर यांच्या उपस्थित जाहीर केले आहे.

इंडिया आघाडीत कॉग्रेस, राष्ट्रवादी पार्टी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)या पक्षाकडून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे. मावळ लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (शिवसेना) यांच्याकडून संजोग वाघीरे यांच्या नावाची चर्चा सध्या चालू आहे.तरी पण मावळ लोकसभा मतदारसंघात कॉग्रेस पार्टीकडून कैलास कदम यांच्या नावाची शिफारस यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी निरीक्षक आमदार रुपणावर यांच्याकडे प्रदेश काँग्रेस पार्टीकडे केली आहे.

केवळ लोकसभा निवडणुकीपुरते इंडिया आघाडीचा विचार न करता २८८ विधानसभा उमेदवारांची जाहीर यादी जाहीर करावी विधानसभा निवडणूक कॉग्रेस स्वतंत्र पणे जरी लढवावी लागली तर शिरूर लोकसभेतील जुन्नर, खेड आणि शिरूर-हवेली या या विधानसभा सभेसाठी तीन उमेदवार आताच तयार असल्याचे जिल्हाध्यक्ष जगताप यांनी सांगितले आहे. तळागाळातील कॉग्रेस कार्यकत्याचा विचार पक्षाने करावा असे यावेळी सांगितले.

यावेळी लोकसभा निरीक्षक आमदार रामहरी रुपणावर,जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप,विघ्नहर्ता साखर कारखान्याचे चेरअमन सत्यशील शेरकर,जिल्हा कॉग्रेसचे महेश ढमढेरे, कैलास कदम, पिपरी चिंचवड ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ,सर्व तालुकाध्यक्ष, शिरूर, मावळ लोकसभेचे बूथ प्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या