मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील माहूर (ता. किनवट ) येथे शनिवार दि.१३ रोजी पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन जिल्हा पत्रकार संघांना रंगाअप्णा वैद्य व आठ तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.पुणे विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाची पुणे विभागीय पातळीवर निवड करून वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण जागतिक स्तरावर कोरोना महामारीचे भीषण संकट ओढवले असताना बहुसंख्य गोरगरीब जनेतेला रोजगारा अभावी उपासमारिचा सामना करावा लागला होता.याप्रसंगी आपले सामाजिक कर्तव्य समजून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते व सहकारी यांनी जिवाची पर्वा न करता कोरोना संकटाने अडचणीत सापडलेल्या, दोन वेळच्या जेवणाचीही सुविधा उपलब्ध नसणाऱ्या कुटूबीयांना जिवनावश्यक वस्तुचे मोफत वाटप केले.जिवघेणा कोरोणा आजार झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वेळोवेळी मदत करून आधार देण्याचे काम केले.पत्रकार संघाच्या या समाज उपयोगी कार्यामुळे कोरोना असर कमी झाल्या नंतर समाजातील विविध स्तरातील संघटनांनी तसेच समाज घटकांकडून पत्रकार संघाचे कौतूक करण्यात आले होते.तसेच पत्रकार संघाच्या याच कार्याची दखल राज्य स्तरावर पत्रकार परिषदेने घेऊन शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचा स्वीकार शिरूर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर , अध्यक्ष संजय बारहाते, समन्वयक पोपटराव पाचंगे,सतिष धुमाळ,धनंजय तोडकर,मारुती पळसकर,नवनाथ रणपिसे,गणेश थोरात,युन्नुस तांबोळी,सिकंदर शेख,धर्मा मैंड,शरद राजगुरू,महादेव साकोरे,अमिन मुलाणी, प्रसिद्धी प्रमुख विलास रोहिले,देविदास पवार यांनी केला.
यावेळी किनवट माहूरचे आमदार भिमराव केराम,भाजपाचे समन्वयक रामदास सुमठाणकर ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,राष्ट्रीय अध्यक्ष शरद पाबळे,विश्वस्त किरण नाईक,निवेदिका विजया देशपांडे,नांदेड जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी,माहूर तालुका अध्यक्ष सर्फराज दुसाणी आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून आलेले पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.