Homeअर्थकारणशासकीय योजनासाठी नागरिकांचा उदंड प्रतिसाद

शासकीय योजनासाठी नागरिकांचा उदंड प्रतिसाद

सणसवाडी प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील सणसवाडी (ता. शिरूर)येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनसामान्य नागरिकापर्यंत पोहचवाण्यासाठी भारतीय जनता पार्टी  पदाधिकारी यांच्या वतीने कॅम्पचं आयोजन करण्यात आलं.
    लेक लाडकी, आयुष्यमान भारत आणि आभा, सौर पॅनल, सुकन्या योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यासह शासनाच्या विविध योजना जनसामान्य लोकांना मिळून देण्यात तसेच त्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आले.यावेळी नागरिकांनी  उस्फूर्त प्रतिसाद देत या योजनेचा लाभ घेतला. यावेळी सुकन्या योजना खाते उघडण्यासाठी सर्व मुलींच्या खाते उघडण्याची अनामत रक्कम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पुढाकार घेत भरण्याचा आश्वासित केलं. यासाठी नागरिकांनी आपल्या मुलींच्या विविध दाखले जमा करून या योजनेचा लाभ घ्यावा अशा आव्हान करण्यात आले.
       देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून विविध योजना राबवल्या असून या योजनांना नागरिकांना लाभ मिळावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबवत सबका साथ सबका विकास हे उद्दिष्ट सफल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतोनात प्रयत्न केले नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता जोपर्यंत लोकांचा प्रतिसाद मिळत आहे तोपर्यंत हा योजना दरबार नागरिकांसाठी खोला राहणार असल्याचे सांगण्यात आले.राज्य आणि केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांपर्यंत विविध राबवत असतं यासाठी एक कोटी सौर ऊर्जा प्रकल्प योजनेचा नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. गाव गाड्यातील कुशल कारागीर यांच्या  पारंपारिक व्यवसायासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबवली जाते यासाठी सर्वसामान्य व्यावसायिकदाराला शासनाच्या वतीने कर्ज उपलब्ध करून देत व्यवसाय भागीदारी देत आर्थिक सहाय्य मदत केली जात असल्याने वंचित घटकांना प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरणाचे धोरण राबवण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे.
    अशा प्रकारचा उपक्रम राबवणारा जिल्ह्यातील पाहिलाच कार्यक्रम असल्याचे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतली आहे. यासाठी विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या