Homeइतरशालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य :गटविकास अधिकारी महेश डोके

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य :गटविकास अधिकारी महेश डोके

शिक्षकांनी विदयार्थ्यांच्या शिक्षणेत्तर कला गुणांना वाव द्यावा

पाबळ प्रतिनिधी:जिजाबाई थिटे

शिरूर पंचायत समितीच्या वतीने नुकताच यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात झाले.
डोके पुढे म्हणाले की शिरूर तालुका संपूर्ण जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे ही निश्चितपणानं आपणां सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे शिरूर तालुक्यामध्ये शिक्षक करत असलेले काम कौतुकास्पद आहे याप्रसंगी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक संतुलित विकास व्हायचा असेल शिक्षणेत्तर उपक्रम प्रभावीपणे राबवून आनंददायी शिक्षण देणे गरजेचे आहे त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया.
शिरूर तालुक्यातील सरदवाडी,कवठे यमाई,न्हावरे, तळेगाव ढमढेरे,पाबळ या पाच बीटाचे यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी संगीत विशारद श्रीहरी मेंदरकर,ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक गणेश मराठे,ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष कैलासराव खंडागळे,शामकांत चौधरी,किरण झुरंगे,सुनील जाधव,मल्हारी उबाळे,संतोष खताळ, दत्तात्रय शिंदे,सेंट जोसेफ इंग्लिश मीडियमच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या तालुकास्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्राच्या साधनव्यक्ती संतोष गावडे,नागेश चाटे, संदीप क्षीरसागर,संदीप गोरडे,राहुल आवारे,संजना गावडे,स्नेहा खरबस यांनी केले
या कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी अनिल बाबर,शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर,किसन खोडदे,एल डी काळे,रघुनाथ पवार,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम,शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या नॅन्सी पायस, अखिल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे,प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोषराव थोपटे,पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव कर्डिले,शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सतीषराव पाचर्णे,निमगाव म्हाळुंगींचे प्राचार्य राजीव मांढरे व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक शहाजीराव पवार व दीपक सरोदे तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे यांनी मानले.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या