Homeताज्या बातम्यादेश-विदेशविजयस्तंभावर शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा;भीम अनुयायची आलोट गर्दी

विजयस्तंभावर शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा;भीम अनुयायची आलोट गर्दी

कोरेगाव भीमा : पुणे जिल्ह्यातील पेरणे (ता. हवेली) येथे असणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी बार्टी, जिल्हा प्रशासन, विजयस्तंभ समिती यांच्या संयुक्तमाने जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत मोठ्या उत्साहात शौर्यदिन साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख, कोल्हापूर परीक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा अधीक्षक अंकित गोयल,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी चव्हाण आणि बार्टीचे प्रमुख अधिकारी यांच्या संयुक्त आणि सूक्ष्म नियोजनामुळे देश तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानवंदना देण्यासाठी आलेले भीम अनुयायी यांना कुठलंही गैर सोय झाली नाही. यावेळी पीएमटी,पीएमपीएलच्या माध्यमातून दोन्ही बाजूनी असणाऱ्या वाहनस्थळ ते विजय स्तंभ हा प्रवास मोफत ठेवण्यात आला होता. तसेच पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस विभागाकडून जवळपास १९२ ठिकाणे सीसीटीव्ही यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले होते. हिरकणी कक्ष, आरोग्य विभाग, स्वच्छता, कृत्रिम स्वच्छतागृह यासह विविध सुविधा उभारण्यात आल्या होत्या.

३१डिसेंबर आणि १जानेवारी या दोन दिवशीय कार्यक्रमासाठी पुणे -नगर रस्त्यावरील वाहतूक विविध मार्गाने वळवण्यात आली होती.विजयस्तंभला तिरंगा प्रतित्मक सजावट करण्यात आली होती . त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आली होती .या सजावटासाठी झेंडू,जेबेरा, गुलाब यासह विविध रंगाच्या फुलांची वापर करण्यात आले होती.१जानेवारीच्या मध्यरात्री फाटक्याची आतिबाजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत जल्लोष पुर्ण वातावरणात शौर्यदिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, आमदार जितेंद्र आव्हाड यासारख्या दिग्गज राजकीय व्यक्तींनी हजेरी लावत अभिवादन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या