Homeस्थानिक वार्तापुणेवाबळेवाडी शाळेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

वाबळेवाडी शाळेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

सिद्धी माळी, पौर्णिमा मासळकर आणि आर्यन कामठे तालुक्यात प्रथमता

(शिक्रापूर प्रतिनिधी)

यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय कला क्रीडा स्पर्धेत वाबळेवाडी शाळेच्या सिद्धी माळी, पौर्णिमा मासळकर आणि आर्यन कामठे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत तालुक्यात बाजी मारली. त्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल शाळेकडून या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शरिफा तांबोळी यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय कला क्रीडा स्पर्धा नुकत्याच शिरूर येथे सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेत मोठ्या गटातील लांब उडी स्पर्धेत आर्यन कामठे, मुलींच्या उंच उडी स्पर्धेत पोर्णिमा मासळकर तर वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी माळी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन व शिष्यवृत्ती तज्ञ विजय गोडसे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरक काळे, प्रतिभा पुंडे, दीपक खैरे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, विद्या सपकाळ, वैशाली जगताप, गितांजली वाघोले आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते.

तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप वाबळे, उपाध्यक्ष मल्हारी वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशकाका वाबळे, माजी सरपंच केशव वाबळे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अंकुश वाबळे, सतिश वाबळे, सुरेखा वाबळे, सतिश कोठावळे, प्रकाश विठ्ठल वाबळे, भगवान वाबळे, खंडू वाबळे, काळूराम वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले. स्वागत विजय गोडसे तर आभार किरण अरगडे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या