Homeताज्या बातम्याराज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील भंडारे पाटील

राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुनील भंडारे पाटील

लोणीकंद

राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी भरारी न्युज चे संपादक सुनील भंडारे पाटील यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली.पेरणे फाटा (तालुका हवेली) येथील समाज प्रबोधन केंद्र मध्ये झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच लोकमान्य टिळक प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषद दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले, त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक उत्तम अण्णा भोंडवे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे,उपसंपादक अशोक बालगुडे, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर झुरुंगे, पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले, दीपक नायक यांनी मार्गदर्शन केले.

राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापकीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे यांनी सांगितले की, समाजामध्ये काम करत असताना पत्रकारांना अनेक अडचणी येतात या अडचणीमध्ये पत्रकारांना कोणच अडचणीत मदत करत नाही, संघटना मात्र पत्रकारांच्या मागे ठामपणे उभे राहते, तसेच त्यांनी संघटनेतील पदाची व प्रोटोकॉल विषयी सविस्तर माहिती दिली, भविष्यात पत्रकारांना आर्थिक मदतीसाठी बँक सुरू करणार असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भंडारे पाटील यांनी सांगितले की, समाजामध्ये काम करत असताना पत्रकारांना अनेक अडचणी येतात, अशा अडचणीमध्ये मदत करणारी फार कमी लोक आहेत, संघटनेच्या माध्यमातून अडचणीतील पत्रकारांना संरक्षण कवच देण्याचे काम संघटना करत असते, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तसेच समाजाचा तिसरा डोळा समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना समाजामधून खरच चांगली वागणूक मिळते का? हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे, यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी विजयराव लोखंडे, तर पुणे विभागीय अध्यक्षपदी नितीन करडे, पुणे शहर अध्यक्षपदी अशोक बालगुडे यांची निवड करण्यात आली, तसेच पुणे विभागीय मुख्य संघटक संभाजी चौधरी, मुख्य सचिव साहेबराव आव्हाळे, मुख्य कार्याध्यक्ष गौतम पिसे, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात,गौतम लोखंडे, कार्याध्यक्ष शंकर पाबळे, महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर, प्रसिद्धीप्रमुख विजय हाडवळे, मुख्य संघटक प्रमोद कुतवळ, संपर्कप्रमुख शरद टेमगिरे, तसेच हवेली तालुका अध्यक्षपदी पोपट मांजरे, उपाध्यक्ष अनिकेत मुळीक, सचिव शिंगू खताळ, कार्याध्यक्ष सागर क्षिरसागर, संपर्कप्रमुख अंबादास डेंगे, प्रवक्ते सतीश शिंगणे, संघटक रेश्मा तांबे, यांची निवड करण्यात आली, राज्य मराठी पत्रकार परिषद, खेड तालुका कार्यकारिणी मध्ये डॉ. देवेंद्र ओव्हाळ, (अध्यक्ष) सुनील शांताराम वाघचौरे (उपाध्यक्ष),अशोक कडलक (कार्याध्यक्ष),गणेश वाळुंज (संपर्क प्रमुख),मनोहर गोरगल्ले (सल्लागार),दीपक बोंबले (सचिव),राहुल सोनवणे (सह – सचिव),विकास शंकर शिंदे(खजिनदार) ,गणेश सावंत ((उप – खजिनदार),सुधाकर अभंग (सदस्य),सचिन साबळे (सदस्य),संजय दाते (सदस्य),संजय साळुंखे (सदस्य),संतोष काळुराम फडके (सदस्य),वेदांत ओव्हाळ (सदस्य),संतोष शंकरराव रायकर (सदस्य), पदी नियुक्ती करण्यात आली.

शिरूर तालुक्याच्या अध्यक्षपदी एकनाथ थोरात, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,सचिव आकाश वडघुले, कार्याध्यक्ष भरत घावटे, संपर्कप्रमुख शुभम वाकचौरे, संघटक संदीप ढाकुलकर, शरद रासकर संघटक, सहसंघटक अल्लाउद्दीन अलवी, कोषाध्यक्ष वैभव पवार, सह कोषाध्यक्ष जयवंत पडवळ, समन्वयक दत्तात्रय कर्डिले, जिजाबाई थिटे, संचालक पावलस गवई, शरद रासकर, विजय ढमढेरे, सचिन थोरवे, यांची निवड करण्यात आली, सर्वांना निवडीचे पत्र व आयकार्ड देण्यात आले, इंदापूर आणि आंबेगाव तालुक्याच्या कार्यकारिणी निवडी देखील करण्यात आल्या.

इंदापूर तालुक्याच्या अध्यक्षपदी संतोष घोडके, उपाध्यक्ष भारत चव्हाण, कार्याध्यक्ष जयसिंग कांबळे, सचिव बापूराव जाधव यांची निवड करण्यात आली आहे, यावेळी पुणे जिल्ह्यामध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेची ताकद, तसेच तळागाळापर्यंत संघटना पोहोचवण्याचा संकल्प सर्वांनी केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या