राजेंद्र गव्हाणे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड

0
86

शिरूर तालुक्यातील डिग्रजवाडी गावातील राजेंद्र महादबा गव्हाणे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,सहकार मंत्री दिलीप वळसे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे, आचार विचार सर्व सामान्य जनतेपर्यत पोहचवून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलं असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तालुकाध्यक्ष रवी काळे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माजी सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा दुध संघांचे संचालक स्वप्नील ढमढेरे, अमित गव्हाणे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!