Homeइतररांगोळीतील कला निष्ठेने जपणाऱ्या तरबेज कलाकार अश्विनी धर्माधिकारी

रांगोळीतील कला निष्ठेने जपणाऱ्या तरबेज कलाकार अश्विनी धर्माधिकारी

प्रतिनिधी – मारुती पळसकर

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील अश्विनी धर्माधिकारी या रांगोळीतील कला निष्ठेने जपणाऱ्या तरबेज कलाकार म्हणून परिसरात परिचित आहेत.

जिद्द,चिकाटी आणि परिश्रम घेण्याची क्षमता असेल तर कुठल्याही क्षेत्रात एखादी महिला आपले नाव उज्वल करू शकते व मेहनतीने त्यातून अर्थार्जन देखील मिळवू शकते याचे एक सुंदर उदाहरण सध्या कवठे येमाई येथे पाहावयास मिळते. रांगोळी काढण्याच्या बालपणीच्या छंदातून लग्नानंतरही निष्ठेने रांगोळी काढण्याचा छंद जोपासणाऱ्या अश्विनी नरेंद्र धर्माधिकारी या बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असताना एक निष्णात तरबेज व आकर्षक गालिचा,संस्कारभारती रांगोळी कलाकार म्हणून अल्पावधीत कवठे येमाई परिसरातील खेडोपाड्यात सुपरिचित झाल्या आहेत. वयाच्या छत्तीशीत असतानाही पती नरेंद्र यांच्या वडापावच्या व्यवसायास हातभार लावत आपला हा रांगोळी काढण्याचा छंद आजही स्वच्छंदपणे जोपासताना दिसत आहेत. अश्विनी यांचे माहेर मुलं सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील साखरवाडी हे गाव. बारावी पर्यंतचे शिक्षण घेताना अगदी बालपणापासून जोपासलेला रांगोळी काढण्याचा छंद अगदी कोलाज जीवनात ही घरी आल्यानंतर जोपासण्याचा अश्विनी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.व्यवसाय निमित्ताने पती नरेंद्र यांच्यासह शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे स्थावर व्हावे लागले. पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून हातभार लावणाऱ्या अश्विनी यांनी कौटुंबिक जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडीत आहेत.आपली दोन मुले श्रीरत्न व साई यांना योग्य ते सुसंस्कार देत त्यांच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष देण्याचे काम त्या करीत आहेत.केवळ जिद्द,चिकाटी व अखंड मेहनत घेण्यामुळे सध्या कवठे येमाई पंचक्रोशीत एक गालिचा,संस्कार भारती रांगोळीतील निष्णात कलाकार म्हणून त्यांची ओळख झाली आहे. रांगोळी काढण्याच्या छंदाचे खरे फळ मागील दोन वर्षांपासून त्यांना मिळू लागले आहे. साधारण सहा फुटी आकर्षक व नजरेत भरेल अशा रांगोळीचे रेखाटन,रंगभरणी करण्यासाठी किमान दोन तास लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यातून एका रांगोळीस किमान एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असल्याचे ही त्यांनी सांगितले.याच बरोबर या कलेची आवड असणाऱ्या गावातील मुलींना ही ही कला अवगत करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत.गावातीलच असलेली प्रतीक्षा संजय कदम ही बी फार्मसीच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेतानाच अश्विनी यांच्या सोबत ही आकर्षक रांगोळी काढण्याची कला ही मनापासून अवगत करीत आहे.परिसरात होणारी मंगल कार्ये,धार्मिक,शैक्षणिक व सणवार प्रसंगी अश्विनी धर्माधिकारी यांना रांगोळी काढण्यासाठी हमखासच बोलावले जाते.त्यांच्या हा आगळावेगळा रांगोळी कलेचा छंद इतरांसाठी नक्कीच आदर्शवत व प्रेरणादायी असाच आहे.आपल्या कुठल्याही मंगल प्रसंगी कलात्मक व आकर्षक रांगोळी काढण्यासाठी ७६६६२९२५३४ या क्रमांकावर अश्विनी यांना संपर्क करावा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या