Homeक्राइममुलींसाठी बाप ठरला कर्दनकाळ ; धारदार कोयत्याने केले वार

मुलींसाठी बाप ठरला कर्दनकाळ ; धारदार कोयत्याने केले वार

गुन्हे युनिट ६ची कामगिरी अवघ्या ३तासात केलं जेरबंद

वाघोली प्रतिनिधी

वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूस राहणाऱ्या फकिरा गुंडा दुपारगुडे याने (ता.३) रोजी आपल्या दहावी शिकणाऱ्या मुलींची धारदार हत्याराने निर्घृन हत्या करून पळून गेला. याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यांचा समांतर तपास गुन्हे युनिट ६च्या पथकाने करत असताना आरोपी हा हडपसर येथील गाडीतळ याठिकाणी उभा असल्याची माहिती गोपनीय माहितीदाराकडून खात्री झाल्यावर तात्काळ युनिट ६च्या अधिकारी आणि अंमलदार यांनी सोलापूर रोडवर आरोपीच्या वर्णनावरून संशयित हालचालीवरून आरोपी फकिरा गुंडा दुपारगुडे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून कसून चौकशी केली असता त्याने मुलगा आणि पत्नी हे घराबाहेर गेले असता माझा आणि मुलगी अक्षदा हिचा दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला असल्या कारणाने घरात असलेल्या ऊस तोडण्यासाठी लागणाऱ्या कोयत्याने सपा सपा वार करत हत्या केल्याची कबुली दिली.या गुन्हातील पुढील कार्यवाहीसाठी त्याला लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार,सहा. पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, गुन्हे २चे सहा.पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे,प्रतीक लाहीगुडे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे,नितीन धाडगे आणि ज्योती काळे यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या