Homeअर्थकारणमुंजाळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी साहेबराव कांदळकर तर व्हाईस चेअरमनपदी देविदास किठे बिनविरोध

मुंजाळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी साहेबराव कांदळकर तर व्हाईस चेअरमनपदी देविदास किठे बिनविरोध


प्रतिनिधी : मारुती पळसकर
शिरूर तालुक्यात लोकसंखेने मोठ्या असलेल्या कवठे येमाई गावात दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत.पैकी मुंजाळवाडी साठी असलेल्या बापूसाहेब गावडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी साहेबराव भाऊसाहेब कांदळकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी देविदास किठे यांची दि.२४ रोजी बिनविरोध निवड झाली.

बापूसाहेब गावडे सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष पांडूरंग मुंजाळ व उपाध्यक्ष सोपानराव देवकर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यानंतर सदर पदांच्या जागी निवडणूक प्रक्रिया पार पडली.या जागेसाठी कांदळकर आणि किठे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.मुख्य लिपीक सहकारी संस्था अप्पासाहेब धायगुडे,सोसायटीचे सचिव अर्जून शिंदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.नव निर्वाचित अध्यक्ष कांदळकर व उपाध्यक्ष किठे यांचे सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे,जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, जेष्ठ व्यक्तीमत्व चांदाशेठ गावडे,माजी पंचायत समिती सदस्य सुदामभाऊ इचके,सरपंच सुनिता पोकळे,उपसरपंच उत्तम जाधव,उद्योजक बाळासाहेब डांगे,माजी चेअरमन बबनराव पोकळे,माजी सरपंच दिपकभाऊ रत्नपारखी,बबनराव पोकळे,अरुणभाऊ मुंजाळ,माजी उपसरपंच अंकुश शिंदे,बाजीराव उघडे समस्थ ग्रामस्थ कवठे येमाई यांनी अभिनंदन केले.


यावेळी संचालक मंडळ पांडूरंग मुंजाळ,सोपानराव देवकर,अंकुश उघडे,भाऊ मुंजाळ,समिंद्राबाई मुंजाळ , दिनकर घोडे,भाऊ घोडे,डॉ.हेमंत पवार,मारुती हिलाळ,विठाबाई मुंजाळ,लहू येडे,विद्याताई हिलाळ,कैलास बच्चे,दत्तात्रय पडवळ,विकास अधिकारी राजेंद्र चाटे,सखाराम मुंजाळ,रामदास सांडभोर,रामदास माळवदे, जानकू मुंजाळ,बबनराव इचके,नवनाथ सांडभोर,निलेश पोकळे,राजेंद्र सांडभोर,मनोहर हिलाळ,माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,कानिफ हिलाळ,अविनाश पोकळे,बाळशिराम मुंजाळ,किसन हिलाळ,आनंदा पवार,बाळू रोहिले,सुरेश हिलाळ ,लहू मुंजाळ,दत्ता देवकार,भिम मुंजाळ,विलास रोहिले,पांडूरंग रोहिले आदि मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या