Homeताज्या बातम्यापुणे जिल्हा युवक कॉग्रेसच्या उपाध्यक्षपदी सचिन नरके वर्णी

पुणे जिल्हा युवक कॉग्रेसच्या उपाध्यक्षपदी सचिन नरके वर्णी

पुणे प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील सचिन नरके यांची नुकतीच पुणे जिल्हा युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र पुणे जिल्हा युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे, अमोल दौंडकर यांच्या उपस्थित देण्यात आले.

सातत्याने युवकांच्या प्रश्नावर काम करत युवकांच्या सुख दुःखात सहभागी असणारे सचिन नरके अशी त्यांची ओळख असून त्यांनी ओबीसी समाजाच्या प्रश्नासाठी अग्रभागी राहून करण्याची त्यांची ख्याती आहे त्यामुळे त्यांना पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असा विश्वास त्यांच्यावर टाकला असल्याचे जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांनी सांगितले.

पक्ष आणि पक्षाचे काम तळागळातील घटकापर्यंत पोचविण्याचे कार्यही जिद्दीने करेल त्याच प्रमाणे कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हा कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप,आमदार संग्राम थोपटे व युवक जिल्हाध्यक्ष महेश टापरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वसामान्य युवकांना काँग्रेस पक्ष हा हक्काने व्यासपीठ वाटेल यासाठी आपण दिवस रात्र मेहनत घ्याल अशी ग्वाही त्यांनी व्यक्त केली.

निवडीच्या वेळी पुणे जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष अशोक भुजबळ,शिरूर तालुका युवक अध्यक्ष संकेत गवारे, अनिरुद्ध शेलार, चेतन दरवडे, गणेश गायकवाड यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या