Homeइतरनिर्वीतील चार भूमिपुत्रांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीत वर्णी

निर्वीतील चार भूमिपुत्रांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीत वर्णी

निर्वी प्रतिनिधी शकील मनियार

शिरूर तालुक्यातील पुण्यभूमी असलेल्या निर्वी ता. शिरूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गटाचे) पुणे जिल्हा कार्यकारणी मध्ये दोघांची तर शिरूर तालुका कार्यकारणी मध्ये दोघांची निवड करण्यात आली आहे. निर्वीकरवर राष्ट्रवादीने टाकलेल्या जबाबदारीमुळे राष्ट्रवादीची निर्वीकरावर भिस्त असल्याचे दिसून आले. नुकतीच निर्वीतील चार भूमिपत्रांची जिल्हा आणि तालुका कार्यकारणी निवड झाली चार भूमिपुत्रांच्या निवडीबद्दल निर्वी गावासह शिरूर तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून व शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कार्यकारणीमघ्ये जिल्हा उपाध्यक्षपदी तात्यासाहेब सोनवणे व जिल्हा युवक सरचिटणीसपदी वैभव पवार तसेच शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक सरचिटणीसपदी प्रदीप साळुंके व युवक उपाध्यक्षपदी राहुल कुल यांची एक मताने निवड करण्यात आली.

त्यांना या निवडीचे पत्र खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी जिल्हा व तालुका पदाधिका-यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.निर्वी या गावातील या चार भूमिपुत्रांच्या निवडीबद्दल त्यांचा गावोगावी सत्कार होत असून त्यांचे अभिनंदन करून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या