Homeस्थानिक वार्तापुणेदरेकरवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर दरेकर तर उपाध्यक्ष अश्विनी कड

दरेकरवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर दरेकर तर उपाध्यक्ष अश्विनी कड

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरेकरवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रभाकर दरेकर तर उपाध्यक्षपदी अश्विनी कड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील पालक सभा आयोजित करण्यात आली. या सभेत विविध समित्या गठित करण्यात आल्या.यावेळी २०२३-२४ ते २०२५-२६ या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्रभाकर दरेकर, उपाध्यक्ष अश्विनी कड शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शंकर दरेकर, नंदू भोसले, माऊली गव्हाळे, राहुल औटी, संदीप दरेकर, सुरेखा दरेकर, सिमा दरेकर, कविता दरेकर, वृषाली दरेकर यांची कार्यकारणी यावेळी सचिव तथा मुख्याध्यापक काळुराम पिंगळे यांनी जाहीर केली.

” ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शासनाने निरधारित केलेल्या योजनाचा तसेच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार. तसेच सामाजिक दयायित्वाच्या माध्यमातून भौतिक सुख सुविधा मध्ये सुधारणा करण्यासाठी कटीबद्ध”

प्रभाकर दरेकर (नवनिर्वाचित अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती)

यावेळी माजी सरपंच प्रमिला दरेकर,माजी उपसरपंच हिरामण दरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी भोसले पोलीस पाटील पांडुरंग दरेकर, सोसायटी माजी संचालक संदीप दरेकर, विकास भोसले यासह पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या