Homeक्राइमगांजा विक्री करणा-या गुन्हेगारांस केले जेरबंद युनिट ६ची कामगिरी

गांजा विक्री करणा-या गुन्हेगारांस केले जेरबंद युनिट ६ची कामगिरी

१लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

वाघोली प्रतिनिधी

वाघोली परिसरातील आव्हाळवाडी फाटा येथील बाजार तळ मैदानाच्या भिंती जवळ दोन युवक गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिटचे कार्यक्षेत्रात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करित असताना संशयीत रित्या एक बॅग हातामध्ये घेऊन त्यांचेकडील मोटार सायकल जवळ उभे असलेले दिसले असता पोलीस पथकास बघुन ते त्यांचेकडील दुचाकी गाडी वरुन निघुन जाण्याचा प्रयत्न करताना आढळून आल्याने व त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या इसमांजवळ व त्यांच्याकडील बॅगेमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे संशय आल्याने, सदर ठिकाणावरुन लोणीकंद पो.स्टे. कडील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करित जात असताना निदर्शनास आल्याने, त्यांना बोलावुन घेवुन, युनिट कडील पोलीस पथक व लोणीकंद पो.स्टे कडील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना त्यांचे ताब्यातील वाहन व बॅगेसह पळुन जात असताना मोठ्या शिताफिने पकडले.

त्यांची चौकशी करताना त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिल्याने त्यांच्या वर अधिकच संशय बाळावला असताना त्या बॅगेची झडती घेतली असता त्यांच्याकडून गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून या गुन्ह्यात १) निखिल यशवंत नवले वय २४ वर्षे, रा. रेल्वे स्टेशन विसापुर ता. श्रींगोदा जि.अहमदनगर २) आदित्य विलास देशमुख वय १९ वर्षे रा, हांडेबाई चौक, अनिकेत जाधव यांचे खोलीत विसापुर ता. श्रींगोदा जि. अहमदनगर यांचे विरुद्ध लोणीकंद पो.स्टे.मध्ये अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडून ०४ किलो २२६ ग्रॅम गांजा, मोटार सायकल व ०३ मोबाईल फोन असा एकुण एक लाख २९हजार रु.किं.चा. मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कार्यवाही सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार,सहा. पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे, गुन्हे २चे सहा.पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पो.स्टे.चे विश्वजीत काइंगडे, सहा. पो. निरी सोमनाथ पडसळकर, तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, विठ्ठल खेडकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहीगुडे, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, नितीन धाडगे, महेंद्र कडु, ज्योती काळे, सुहास तांबेकर, सागर जगताप, अमोल ढोणे यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या