कवठे येमाई येथील अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

0
70

प्रतिनिधी : मारुती पळसकर

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे श्री.दत्त जयंती निमित्त बुधवार दि.२० ते दि.२७ डिसेंबर या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.दि.२७ रोजी ह.भ.प.एकनाथ महाराज सांगोलकर शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होऊन या अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.

सप्ताहाचे यंदा ४९ वे वर्ष होते.सप्ताह कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये अभंगवाणी, किर्तने, हरिपाठ, गुरुचरित्र, पारायण,काकड आरती, भजन,हरिजागर,विना प्रहार आदि कार्यक्रमांचा समावेश होता.सप्ताह निमित्ताने भव्य मंडप उभारून मंदिरात आकर्षक विद्यूत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.दररोज सायंकाळी किर्तन रुपी सेवा पार पडल्यानंतर उपस्थित वारकऱ्यांना भोजनाची व्यवस्था होती.तर कालच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होऊन भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.कार्यक्रमाचे आयोजन श्री.दत्त जयंती उत्सव समिती व समस्थ ग्रामस्थ कवठे येमाई यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!