Homeस्थानिक वार्तापुणेकर्जत तालुक्यातील शंभर शिक्षकांचा वाबळेवाडी शाळेत अभ्यास दौरा

कर्जत तालुक्यातील शंभर शिक्षकांचा वाबळेवाडी शाळेत अभ्यास दौरा

शिक्षणाधिकारी पुनीत गुरव आणि गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांचे आयोजन.

( पुणे प्रतिनिधी)

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनीत गुरव, कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी कर्जत तालुक्यातील शंभर शिक्षकांसह उपक्रमशील अशा वाबळेवाडी शाळेस भेट देऊन विविध सहशालेय उपक्रमांची पाहणी केली. शालेय गुणवत्तेबाबत विद्यार्थी ,शिक्षक व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी येथील नाविन्यपूर्ण नवोपक्रम पाहून अधिकारी व शिक्षक भारावून गेले.

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनीत गुरव, कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या विशेष प्रयत्नांतून कर्जत तालुक्यातील एकूण शंभर शिक्षकांचा अभ्यास दौरा पुणे जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा वाबळेवाडी येथे आयोजित केला होता. शाळेच्या वतीने प्रथमतः रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनीत गुरव, कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिक्षणाधिकारी पुणे गुरव यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. आज पर्यंत वाबळेवाडी शाळेतील अनेक चांगल्या उपक्रमांविषयी ऐकून होतो. आज प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. भविष्यात रायगड सारख्या जिल्ह्यातही वाबळेवाडी सारख्या शाळा तयार करून दाखवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्जत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यावेळी म्हणाले,वाबळेवाडी शाळेचा जगभरात नावलौकिक आहे. ही शाळा पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. आज शाळा पाहून गेल्यानंतर निश्चित याचा फायदा कर्जत तालुक्यातील शाळांना होईल अशी मला खात्री आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच केशव वाबळे, सतीश वाबळे, दत्तात्रय बारगळ आणि बंडू कुकडे या ग्रामस्थांनी आलेल्या टीमला शाळेची माहिती दिली. तसेच शाळेतील पदवीधर शिक्षक विजय गोडसे आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती सर्व टीमला दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!

ताज्या बातम्या